आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Priyanka Sizzle Between Gunday In Her Cabaret Avatar

\'गुंडे\'मध्ये प्रियांकाचा कॅबरे डान्स, पाहा तिचा हॉट लूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड इंडस्ट्रीत 'देसी गर्ल' नावाने प्रसिध्द असलेली प्रियांका चोप्रा यावर्षी सुपर धूम घालण्यासाठी तयार आहे. तेही डबल धमालसोबत. हो खरेच, प्रियांका चोप्रा 'गुंडे' या आगामी सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सोबतच, ती या सिनेमात कॅबरे डान्सने सर्वांना भूरळ घालणार आहे.
अलीकडेच, प्रियांकावर तयार केलेल्या कॅबरे डान्सलासुध्दा लाँच करण्यात आले आहे. गाण्याचे बोल आहेत, 'अस्सलाम-ए-इश्क'. या गाण्यामध्ये प्रियांका बोल्ड लूक दाखवणार आहे.
कॅबरे साँगमध्ये रणवीर आणि अर्जुननेसुध्दा प्रियांकाला साथ दिली आहे. दोघेही प्रियांकासोबत ठुमके लावताना दिसणार आहे. 'गुंडे' सिनेमातील या गाण्याला बप्पी लहरी आणि नेहा भसीन यांनी गायले आहे आणि गाण्याचे बोल इरशाद कामिलने लिहले असून संगीत सोहेल सेन यांनी दिले आहे.
'गुंडे' हा सिनेमा व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी म्हणजेच 14 फेब्रुवारीला रिलीज होणारा आहे. या अ‍ॅक्शन थ्रिलर सिनेमाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केले आहे. सिनेमात प्रियांका रणवीर आणि अर्जून दोघांसोबतही रोमान्स करताना दिसणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा प्रियांकाच्या कॅबरे डान्सची एक झलक...