आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Priyanka Was Chanting The Gayatri Mantras Holding Dr Chopra Hand

वडिलांच्या शेवटच्या क्षणी त्यांचा हात पकडून गायत्री मंत्राचा जप करत होती प्रियांका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अभिनेत्री प्रियांका चोप्राचे वडील डॉ. अशोक चोप्रा यांचे निधन झाले आहे. ते गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजारी होते. त्यांना कर्करोग झाला होता. मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.
रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी चोप्रा यांची प्रकृती नाजूक झाल्याची बातमी कुटुंबीयांना दिल्यानंतर प्रियांका रात्रभर वडिलांजवळ थांबली होती.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी प्रियांका आणि तिच्या कुटुंबीयांना अशोक चोप्रा यांच्यासाठी 48 तास अतिशय क्रिटिकल असल्याची माहिती दिली होती. वडिलांच्या शेवटच्या क्षणी प्रियांका त्यांच्याजवळच होती. वडिलांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी, म्हणून प्रियांका त्यांचा हात हाती घेऊन गायत्री मंत्राचा जप करत होती. मात्र प्रियांकाच्या प्रार्थनेला यश आले नाही. डॉक्टरांनी चोप्रा यांना मृत घोषित केले. डॉ. अशोक चोप्रा यांच्या पश्चात पत्नी मधू, मुलगी प्रियांका आणि मुलगा सिद्धार्थ आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा प्रियांकाची भाऊ आणि आईवडिलांबरोबरची छायाचित्रे...