आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Puja Gupta Does A James Bond Girl Scene In Go Goa Gone

'गो गोवा गॉन'मध्ये बॉण्ड गर्लसारखी होईल पूजा गुप्ताची एन्ट्री

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

2007 साली मिस इंडिया युनिव्हर्सचा किताब आपल्या नावी करणा-या पूजा गुप्ताला फायनली बॉलिवूडमध्ये मोठा ब्रेक मिळाला आहे. 'फालतू' या सिनेमाद्वारे बी टाऊनमध्ये एन्ट्री घेणारी पूजा आता सैफ अली खानच्या 'गो गोवा गॉन'मध्ये झळकणार आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या सिनेमात पूजाची जबरदस्त एन्ट्री होणार आहे. सिनेमात पूजा बिकिनी परिधान करुन समुद्रातून बाहेर येताना दिसणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, अशाप्रकारच्या दृश्याला बॉलिवूडमध्ये विशेष पसंती दिली जात आहे. यापूर्वी अशाप्रकारचे दृश्य 'डॉक्टर नो' आणि 'क्वांटम ऑफ सोलेस' या हॉलिवूड सिनेमांमध्ये चित्रीत करण्यात आले होते.

1963 साली रिलीज झालेल्या 'डॉक्टर नो' या सिनेमात चित्रीत करण्यात आलेले हे दृश्य खूपच लोकप्रिय झाले होते. या सिनेमात अभिनेत्री उर्सुला एंड्रेस बिकिनी परिधान करुन समुद्रातून बाहेर येताना दिसली होती. 'क्वांटम ऑफ सोलेस' या सिनेमातही अशाचप्रकारचे दृश्य प्रेक्षकांना बघायला मिळाले होते. आता गो गोवा गॉन या सिनेमातही या दृश्याचा समावेश करण्यात आला आहे.

याविषयी पूजाने सांगितले की, ''मी भाग्यशाली आहे की, माझा हा बिकिनी सीन सिनेमाच्या शेड्यूलमध्ये शेवटी चित्रीत करण्यात आला. त्यामुळे मला आपली बॉडी तयार करायला बराच वेळ मिळाला. या दृश्याद्वारे सिनेमात माझी एन्ट्री होणार आहे. त्यामुळे मी खूप उत्साहित आहे.''