आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंगनाने केले 'क्वीन'चे प्रमोशन, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत सध्या आपल्या आगामी 'क्वीन' सिनेमाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. याच निमित्ताने ती काल (24 फेब्रुवारी) मुंबईतील महबुब स्टुडिओत पोहोचली होती. येथे ती खूपच साध्या अंदाजात दिसली.
'क्वीन'च्या प्रमोशनवेळी या सिनेमातील दुसरी लीड अभिनेत्री लीसा हेडनसुद्धा कंगनासह उपस्थित होती. कंगना साध्या पंजाबी ड्रेसमध्ये यावेळी दिसली, कर लीसा ब्लॅक ड्रेसमध्ये खूप स्टायलिश दिसत होती.
'क्वीन'मध्ये कंगनाने छोट्या शहरातील राणी नावाच्या तरुणीची व्यक्तिरेखा साकारली आहे. ही राणी बबली गर्ल आहे.
या सिनेमाविषयी सांगायची खास गोष्ट म्हणजे, या सिनेमातील संवाद स्वतः कंगनाने लिहिले आहेत.
विकास बहल दिग्दर्शित हा सिनेमा अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी यांनी प्रोड्युस केला आहे. कंगना आणि लीसाशिवाय राजकुमार रावचीही महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहे. येत्या 7 मार्चला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा प्रमोशनवेळी क्लिक झालेली कंगना आणि लीसाची खास छायाचित्रे...