आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • R K Studio And Nana Patekar Ganpati Visrjan Pics

PICS:आरके स्टूडियोच्या गणपती विसर्जनाला रणबीर गैरहजर, नानानेही दिला बाप्पा निरोप

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईत बुधवारी ठिकठिकाणी विसर्जन झाले. अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या घरी विराजमान असलेल्या बाप्पाला निरोप दिला. कपूर फॅमिलीच्या आर.के. स्टुडिओतील गणपती आणि नाना पाटेकर यांच्या घरच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. आर.के स्टुडिओतील गणपती विसर्जनाची जबाबदारी रणधीर कपूर आणि राजीव कपूर यांनी सांभाळली.

रणधीर कपूर आणि राजीव कपूर यांनी वाजत गाजत आपल्या बाप्पला निरोप दिला आणि पुढील वर्षी लवकर येण्याची विनंती केली. रंजक गोष्ट म्हणजे अभिनेता रणबीर कपूर विसर्जनाच्या दिवशीही अनुपस्थित होता. रणबीरने पूजेतही आपला सहभाग नोंदवला नाही. तर दुसरीकडे नाना पाटेकर यांनीही आपल्या बाप्पाला ढोलताश्याच्या गजरात निरोप दिला.

बघा या स्टार्सच्या गणपती विसर्जनाची खास छायाचित्रे...