आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rageshwari Loomba Ties The Knot With Sudhanshu Swaroop

PHOTOS : गायिका रागेश्वरी अडकली विवाहबंधनात, शुभेच्छा द्यायला पोहोचले सेलिब्रिटी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गायिका आणि अभिनेत्री रागेश्वरी लुम्बा 27 जानेवारी रोजी लग्नगाठीत अडकली. तिने युकेतील रहिवाशी असलेल्या सुधांशू स्वरुपची जोडीदार म्हणून निवड केली आहे.
रागेश्वरी आणि सुधांशूचे लग्न हिंदू परंपरेनुसार झाले. या लग्नाला दोघांच्याही कुटुंबीयांसह बॉलिवूडमधील काही कलाकारमंडळी हजर होती. सर्वांनी त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. बॉलिवूडमधून जुही चावला, सुश्मिता सेन, पूदा बेदी, राजू हिरानी, कृषिका लल्ला, पुनीस इस्सर या सेलिब्रिटींनी या लग्नाला हजेरी लावली होती.
प्रसिद्ध फॅशन डिझायनर नीता लुल्ला यांनी रागेश्वरीसाठी लग्नाचा ड्रेस डिझाइन केला होता. रागेश्वरी आणि सुधांशू यांचे अरेंज्ड मॅरेज आहे. लग्नानंतर रागेश्वरी लंडनमध्ये स्थायिक होणार आहे.
नव्वदच्या दशकात रागेश्वरीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 'मैं अनाडी तू खिलाडी', 'आँखे' या सिनेमात ती झळकली होती. अभिनयात विशेष यश न मिळाल्याने रागेश्वरीने गायिका म्हणून करिअर सुरु केले. तिचे अल्बम्स बरेच गाजले होते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा रागेश्वरीच्या लग्नाची खास छायाचित्रे...