आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajanikant's Kochaidayan Come To Audience On Diwali Eva

दिवाळीत रजनीकांतचा ‘कोचाईदाईयान’ येतोय प्रक्षेकांच्या भेटीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरात दक्षिण भारतातील चित्रपटसृष्टी नेहमीच पुढे असते. देशातील पहिला मोशन कॅप्चर पद्धतीने तयार झालेला 3 डी चित्रपट घेऊन रजनीकांत दिवाळीत प्रेक्षकांसमोर येत आहे. ‘कोचाईदाईयान’ चित्रपटात त्याची दुहेरी भूमिका असून या चित्रपटाचे दिग्दर्शन त्याची मुलगी सौंदर्या हिने केले आहे. सोमवारी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर चित्रपटाचा पहिला टीजर प्रदर्शित करण्यात आला.


हा टीजर खरोखरच अनोखा असून त्यात रजनीकांत अनोख्या पद्धतीने अधोरेखित करण्यात आला आहे. हीरो व सुपरहीरो अनेक आहेत, परंतु रजनीकांत केवळ एकच आहे, या आशयाच्या स्लोगनने तो पडद्यावर अवतरतो आणि मग दिसतो रजनीचा जलवा. अवतार आणि ट्रॉन चित्रपट मोशन कॅप्चर पद्धतीने तयार करण्यात आले आहेत. या धर्तीवर या चित्रपटाचे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.


हिंदीसह सहा भाषेत प्रदर्शित होणार : रजनीकांतने 2011 मध्ये राणा चित्रपटाची सुरुवात केली होती, परंतु आजारपणामुळे त्याचा हा चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही. त्या चित्रपटाऐवजी मुलगी सौंदर्या हा नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहे. ए.आर. रहमान यांनी चित्रपटाला संगीत दिले असून ऑक्टोबरमध्ये चित्रपटाची ध्वनिफीत प्रदर्शित केली जाणार आहे.


दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित करण्याची योजना आखण्यात आली आहे. हा चित्रपट हिंदी तमिळ, तेलुगू, इंग्रजी, चिनी आणि जपानी भाषेतही प्रदर्शित केला जाणार आहे.


आठव्या शतकातील शूर राजाचे पात्र
कलाकारांच्या शरीराला वायरी लावून त्यांचे चालणे, बोलणे, अ‍ॅक्शन चित्रित केले जाते आणि नंतर पडद्यावर त्या अ‍ॅनिमेटेड व्यक्तिरेखांना कलाकारांचा चेहरा संगणकाद्वारे लावण्यात येतो. त्यामुळे अ‍ॅनिमेटेड व्यक्तिरेखांना खरे चेहरे मिळतात. या चित्रपटात रजनीकांत आठव्या शतकातील एका शूर राजाची भूमिका साकारत आहे. चित्रपटात रजनीकांतची नायिका म्हणून दीपिका पदुकोन दिसणार आहे. पहिल्या टीजरमध्ये दीपिकाला स्थान देण्यात आले नाही.