आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajjo Movie Censor Board Latest Bollywood Entertainment News

अल्पवयीन \'चंदू\'चे लग्न लावल्याने रि‍लीज होण्याआधीच अडचणीत सापडला \'रज्जो\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कंगना रानावत हिचा 'रज्जो' रिलीज होण्याआधीच अडचणीत सापडला आहे. सेन्सर बोर्डाने 'रज्जो'च्या दिग्दर्शक विश्वास पाटील यांना नोटीस बजावली आहे. 'चंदू' नामक पात्राचे अल्पवयातच विवाह केल्यामुळे 'रज्जो' वादग्रस्त ठरला आहे.

सिनेमात चंदूचे वय 18 वर्षे दाखविण्यात आले असून त्यापेक्षा वयाने मोठी असलेल्या 'रज्जो'शी (कंगना) त्याचे लग्न लावण्यात आले आहे. भारतीय संविधानानुसार पुरूषाचे विवाहाचे वय 21 वर्षे निर्धारित करण्‍यात आले आहे. चंदूच्या वयावरून सेन्सर बोर्डाने 'रज्जो'चे दिग्दर्शक विश्वास पाटील यांना नोटीस बजावली आहे. भारतीय संविधानानुसार सिनेमातही चंदूचे वय 21 वर्षे दाखवायला हवे, असेही सेन्सर बोर्डाने नोटीशीत म्हटले आहे.

विश्वास पाटील यांनी सेन्सर बोर्डापुढे अनेकदा 'उठबशा' काढूनही त्याचा काही उपयोग झाला नाही. सेन्सर बोर्ड आपल्या भूमिकेवर ठाम आहे. अखेर 'रज्जो'मधील चंदूच्या लग्नाचा सीन डब करण्यात आला आहे.

पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करून जाणून घ्या, 'रज्जो'बाबत खास किस्से...