आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छायाचित्रांमध्ये बघा \'पानिपत\'कार विश्वास पाटील यांच्या \'रज्जो\' सिनेमाची खास झलक...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्कृष्ट संवाद, कंगना राणावत आणि पारस अरोराची लव्ह स्टोरी, महेश मांजरेकर .यांचा आगळावेगळा तृतीयपंथी भासेल असा स्त्री वेश आणि तसाच दे धडक रोल अशी ख्याती पावलेला 'रज्जो' हा सिनेमा येत्या १५ नोव्हेंबरला बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय.
विश्वास पाटील हे नाव साहित्य क्षेत्रातील भारदस्त नाव आहे. 'पानिपत'कार विश्वास पाटलांची 'फोर पिलरस एन्टरटेन्मेंट' नावाची सिनेक्षेत्रातील निर्मिती संस्था आता 'रज्जो 'च्या माध्यमातून उंच भरारी घेते आहे. 'रज्जो' या सिनेमाची गाणी ही यूटयूबवर सध्या गाजत आहे.
'रज्जो' ही एक प्रेमकथा असून एका लहान वयाच्या तरुणाची कंगना रणावत ही हिरोईन आहे. या अभिनेत्याचे नाव आहे पारस अरोरा. प्रकाश राज आणि जया प्रदा यांच्याही या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
दिल तो पागल है, गदर, दुश्मन या प्रसिद्ध सिनेमांचे संगितकार उत्तमसिंग यांचे संगीत या सिनेमाला आहे. अप्सरा आली, वाजले की बारा ही गाजलेली गाणी स्वरबद्ध करणारी मराठमोठी गायिका बेला शेंडे हिला 'रज्जो'द्वारे हिंदीमध्ये मोठा ब्रेक मिळला आहे. 'कलेजा ही हाजीर, खंजर कहा है, मेरी जान ले ले तू क्यू परेशान है', या शिवाय मेरे घुंगरू ; क़ैसे मिलू मै पिया अशी बहारदार गाणी बेल शेंडे हिने या सिनेमात गायली आहेत. आनंद इंगळे, उपेंद्र लिमये ही मराठी कलाकारमंडळी देखील या सिनेमात आहेत.
छायाचित्रांमधून बघा 'रज्जो'ची खास झलक...