आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘काय पो छे’ स्टार राजकुमारला ‘हीरो’ म्हणणे आवडत नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘काय पो छे’ चित्रपटात गोविंदच्या भूमिकेसाठी प्रशंसा मिळवणार्‍या राजकुमार यादवला हीरो शब्दाचा तिटकारा आहे. दिबाकर बॅनर्जी यांच्या ‘लव सेक्स और धोखा’ चित्रपटातून आपल्या कारकीर्दीची सुरुवात करणारा राजकुमार म्हणतो की, हीरो चित्रपटात नसतो तर खर्‍या जीवनात असतो.

बॉर्डर आणि समाजात खास हीरो असतात. आमच्या चित्रपटात तर पात्र आणि कलाकार असतात. मला जेव्हा लोक म्हणतात की, तुम्ही आमच्या चित्रपटातील हीरो आहात, तर मी त्यांना म्हणतो की, मी चित्रपटातील अँक्टर आहे. पारंपरिक हीरोच्या प्रतिमेपेक्षा वेगळा दिसणार्‍या राजकुमारच्या मते, मी जसा आहे तसाच मी स्वत:ला सादर करतो. पात्राच्या मागणीनुसार मी स्वत:ला कुरूप चेहर्‍यासोबतही सादर करू शकतो.