आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajnikanth Postponed Dabbing Because Of Deepika Padukone

दीपिकाने रजनीकांतला ठेवले वेटिंगवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुपरस्टार रजनीकांत व दीपिका पदुकोण यांच्या ‘कोचड्डीयान’ या सिनेमाचे प्रदर्शन दीपिकामुळे अर्ध्यावर लटकले आहे. ‘ये जवानी है दिवानी’च्या रिलीजनंतर दीपिका आपल्या कुटुंबासोबत सुटीवर गेली आहे. सुटीवरून आल्यावर लगेच ती ‘चेन्नई एक्स्प्रेस’ व ‘रामलीला’च्या चित्रीकरणामध्ये व्यग्र होणार आहे. व्यग्र वेळापत्रकामुळे ‘कोचड्डीयान’ या तामिळ सिनेमाचे डबिंग पूर्ण करण्यासाठी तिच्याकडे सध्या मुळीच वेळ नाही. तामिळ भाषेतील उच्चार आणि शब्दावलीसाठी डबिंग आर्टिस्टची सोय करण्यात आली आहे. मात्र आवाज दीपिकाचाच असणार आहे. त्यामुळे डबिंगसाठी दीपिकाची वाट पाहिली जात आहे. रजनीकांत हा सिनेमा तामिळ व हिंदी भाषेत एकाच वेळी प्रदर्शित करू इच्छित आहे. असो, दीपिकाची व्यग्रता लक्षात घेऊन रजनीकांत पुढील महिन्यात डबिंगचे काम सुरू करणार आहेत.