आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajpal Yadav Sent To 10 Days Police Custody In Recovery Suit

अभिनेता राजपाल यादवला दहा दिवसांची न्यायालयीन कोठडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई - पाच कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता राजपाल यादवला दहा दिवसांच्या न्यायालयी कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले आहेत.

याप्रकरणी राजपालच्या पत्नीलादेखील आरोपी ठरवण्यात आले आहे. दिल्लीतील एका व्यावसायिकाने दाखल केलेल्या तक्रारीनंतर दिल्ली उच्च न्यायालयाने राजपालला दहा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

तर राजपालची पत्नी राधा यादव हिला न्यायाधिश श्रीधर एस मुरलीधर यांनी न्यायालयीन कारवाई संपेपर्यंत रजिस्ट्रार जनरलच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय या दोघांची बाजू मांडणा-या दोन वकिलांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या, नेमके प्रकरण आहे तरी काय...