आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विना रजिस्ट्रेशन प्रॉडक्शन हाऊस चालवतो राम गोपाल वर्मा, धाडीत झाली पोलखोल !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिनेनिर्माते आणि दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांच्या कार्यालयावर सर्व्हिस टॅक्स विभागानं बुधवारी धाड टाकली.
मुंबईत ओशिवरास्थित रामगोपाल वर्मा फिल्म्स फॅक्टरीच्या कार्यालयात सर्व्हिस टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी आठ तासांपेक्षा जास्त वेळ तपासणी केली. रामगोपाल वर्मा आणि त्यांच्या सीएची चौकशीही यावेळी करण्यात आली. अधिकाऱ्यांनी वर्मांच्या अंधेरीतील मिल्लतनगरस्थित कार्यालयासंबंधीही चौकशी केली.

सूत्रांच्या माहितीनुसार, रामगोपाल वर्मा यांनी आपल्या कंपनीला सर्व्हिस टॅक्स विभागामध्ये रजिस्टर केलेलं नाही. त्यामुळे आता सर्व्हिस टॅक्स विभाग त्यांच्या कार्यालयावर टाकलेल्या धाडीच्या आधारे त्यांच्याकडून सर्व्हिस टॅक्स वसूल करणार आहे. सिनेमा दिग्दर्शकांना सर्व्हिस टॅक्स जमा करणं गरजेचं असतं.


ज्यांना नोटीशी धाडण्यात आल्यात त्या 132 फिल्म सेलिब्रिटींमध्ये वर्मा यांच्या नावाचा समावेश नाही. त्यांच्याजवळ वर्मा प्रोडक्सन हाऊसेसचा एकही रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचं चौकशीत सर्व्हिस टॅक्स अधिकाऱ्यांच्या लक्षात आलंय. त्यामुळे वर्मा यांनी 2010 नंतर काम केलेल्या सर्व प्रोजेक्टसची तपासणी या विभागानं करण्यास सुरुवात केलीय.

अधिकाऱ्यां रामूच्या ऑफिसवर बुधवारी दुपारी दोन वाजता पोहोचले. रात्री अकरा वाजेपर्यंत ही कारवाई सुरु होती. अधिकाऱ्यांच्या मते, रामूच्या प्रॉडक्शन हाऊसचा कोणताही रेकॉर्ड नाहीये. वर्मा यांनी आपल्या प्रॉडक्शन हाऊसची नोंदणी हैदराबादमध्ये केल्याचे सांगितले होते. मात्र तपासाअंती तसे काहीही आढळून आले नाही.


तसे पाहता प्राप्तीकर विभागातर्फे कारवाई करण्यात येणारे राम गोपाल वर्मा बॉलिवूडमधील एकमेव सेलिब्रिटी नाहीये. यापूर्वी मे 2013 मध्ये एकता कपूर, जानेवारी 2011 साली प्रियांका चोप्रा आणि कतरिना कैफ यांच्या घरावरही प्राप्तीकर विभागाने धाडी घातल्या होत्या. ऑक्टोबर 2010 साली सुद्धा दिवंगत निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा, निर्माता साजिद नाडियावाला आणि बाबा फिल्म्सचे संचालक गोवर्धन तनवानी यांच्या घरावर आणि ऑफिसवर धाडी टाकण्यात आल्या होत्या.

विशेष म्हणजे बॉलिवूडच्या काही सेलिब्रिटींनी प्राप्तीकर विभागाच्या अधिका-यांची नजर त्यांच्या संपत्तीवर पडू नये यासाठी अनेक क्लुप्त्या लढवल्या होत्या.

एक नजर टाकुया सेलिब्रिटींनी नेमके काय केले होते...