आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ramgopan Varma\'s Different Experiment In The Attack Off 26 11

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रामगोपाल वर्मांचा ‘द अ‍टॅक ऑफ 26/11’मधून वेगळा प्रयत्न !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - नव्वदच्या दशकात बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून आपले करिअर सुरू करणा-या रामगोपाल वर्मा यांनी गेल्या काही वर्षात अनेक पडेल चित्रपट दिले आहेत. त्यामुळे त्यांच्या 1 मार्च रोजी प्रदर्शित होणा-या ‘द अ‍टॅक ऑफ 26/11’ या चित्रपटांकडून सर्वांना अपेक्षा आहेत. 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याची कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे.

रामूने याआधी बॉलिवूडला अनेक हिरोइन्स आणि हिट चित्रपटांची भेट दिली. मात्र, गेल्या काही वर्षात त्याने अनेक सुमार दर्जाचे चित्रपट देऊन अनेकांची नाराजी ओढवून घेतली. त्याने 1889 मध्ये ‘शिवा’ त्यानंतर ‘रात’, ‘द्रोही’, ‘रंगीला’, ‘सत्या’, ‘जंगल’, ‘कंपनी’, ‘भूत’, ‘सरकार’ आणि ‘सरकार- राज’ असे हिट चित्रपट दिले. मात्र, यानंतर आलेल्या ‘रामगोपाल वर्मा की आग’ या चित्रपटाने तर कहरच केला होता. चित्रपट सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच अनेकांनी थिअटरमधून घरी जाणे पसंत केले होते. यानंतर रामूवर अनेकांनी टिकेची झोड उठवली होती. तसेच यामुळे महानायक अमिताभ बच्चन यांनाही टिकेचे धनी बनावे लागले होते. यानंतर वर्माच्या फ्लॉप चित्रपटांची गाडी काही केल्या थांबली नाही.

‘रक्तचरित्र’, ‘भूत रिटर्न्स’, ‘डिर्पाटमेंट’ असे आणि आणखी काही त्याचे चित्रपट बॉक्स ऑ फिसवर साफ आपटले. त्यानंतर रामूकडे पाहण्याचा अनेकांचा दृष्टिकोन बदलला. तसेच त्यांच्यासोबत काम करण्यास मोठे कलाकार कचरत असल्याच्या बातम्या माध्यमांतून आल्या होत्या. याचवेळी 2008 मध्ये मुंबईत पाक अतिरेकी अजमल कसाब आणि त्यांच्या साथीदारांनी भयावह हल्ला केला होता. त्यानंतर वर्मांना या हल्ल्यावर चित्रपटाची कथा सुचली होती. हल्ल्याच्या काही दिवसांनंतर त्याने विलासराव देशमुख, त्यांचा अभिनेता मुलगा रितेश यांच्यासोबत ताज हॉटेलची वारी केली होती. याचा परिणाम म्हणून देशमुखांना आपली खुर्ची सोडावी लागली होती. त्यावेळी या चित्रपटात रितेश काम करणार असल्याच्या बातम्याही आल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात आता 26/11 मध्ये नाना मुख्य भूमिकेत आहे.
छोट्या पडद्यावर प्रोमो
‘द अ‍टॅक ऑफ 26/11’ चित्रपटाचा प्रोमो सध्या छोट्या पडद्यावर दाखवला जात आहे. हा प्रोमो जबरदस्त झाला असून यात संजीव जयस्वाल (अजमल कसाब) हा सीएसटीवर बेछुट गोळीबार करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. तर समुद्रातून अतिरेकी मुंबईत कसे घुसले याचा काही भागही यात दाखवण्यात येत आहे. एकूणच या चित्रपटाबद्दल सर्वांना उत्सुकता लागली आहे.