आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणवीर-दीपिकाच्या 'राम-लीला'ची आर्थिक बाजू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंकगेल्या दोन आठवड्यांत राकेश रोशन यांच्या ‘क्रिश-3’ चित्रपटाची विदेशी आणि तामीळ, तेलुगू डब आवृत्ती मिळून कमाई 250 कोटी रुपयांपर्यंत गेली आहे.

संजय लीला भन्साळी आणि इरॉस इंटरनॅशनल कंपनी यांचा ‘राम-लीला’ प्रदर्शित झाला. त्याची निर्मिती 65 कोटी रुपयांत झाली. प्रिंट आणि प्रचार खर्च 20 कोटी रुपये आहेत. एकूण उत्पादनाचा खर्च 85 कोटी आहे.

संजय भन्साळी यांचे मागील यश आणि रणवीर सिंहचे कमी स्टारडम असूनही इरॉस कंपनीने चित्रपटावर मोठी रक्कम लावली. टी सीरीजने चित्रपटाच्या संगीतासाठी पुरेसे पैसे देण्यास नकार दिला त्यामुळे इरोज कंपनी संगीतदेखील विकत आहे. हे अत्यंत लोकप्रियदेखील आहे. मोबाइल रिंगटोनमुळे मोठी किंमत मिळण्याची अपेक्षा केली जात आहे. सुटीच्या दिवसामुळे चित्रपट पहिल्या दिवशी 15 कोटी रुपयांची कमाई करू शकतो आणि वीकेंडपर्यंत 50 कोटी रुपये होऊ शकते. लोकप्रिय संगीत आणि दीपिका पदुकोणमुळे चित्रपटाला चांगले यश मिळू शकते.