आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामू म्हणतो, मित्रांची गरज नाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गेल्या काही वर्षांपासून अनेकांच्या टीकेचा धनी बनलेल्या दिग्दर्शक रामगोपाल वर्माचे ‘द अ‍ॅटक ऑफ 26/11’ या चित्रपटामुळे अनेक जण कौतुक करत आहेत. आपण भावनिक नसल्याने मित्रांची कधीही गरज भासली नसल्याचे रामूने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले.

या वेळी तो म्हणाला, मी अतिशय वेगळा मनुष्य आहे. मला एकही मित्र नाही. कारण मला त्याची गरज वाटत नाही. तसेच मी भावनिक नसून कोणाच्याही खांद्यावर डोके ठेवून रडण्याची मला गरज नाही. चित्रपट तयार करणे किंवा पाहणे यातच व्यस्त असल्याने सामाजिक कार्यात आपण सहभाग घेत नाही. ज्या वेळी चित्रपट तयार करत असतो त्या वेळी मी लोकांशी बोलत असतो. मात्र, त्यांच्याशी आपली जवळीक करण्याची इच्छा नसते. तसेच चित्रपटांमुळे पार्ट्या करण्यात रस नसल्याचे रामूने सांगितले. गेल्या काही वर्षांत रामूने केलेले अनेक चित्रपट सुमार दर्जाचे होते. त्यामुळे त्याच्यावर अनेकांनी टीका केली होती. मेगास्टार अमिताभ बच्चन यांना घेऊन ‘सरकार’ हा चित्रपट केल्यानंतर त्यांच्यामागे शुक्लकाष्ठ सुरू झाले. यानंतर त्याने अनेक सुमार चित्रपट दिले. यात ‘रामगोपाल वर्मा की आग’, ‘रक्तचरित्र’, ‘फूक’,‘डिपार्टमेंट’ या आणि इतर चित्रपटांचा समावेश होता. या चित्रपटांमुळे समीक्षकांनी त्याला चांगलेच झोडून काढले होते तरीदेखील याचा रामूवर काहीही परिणाम झाला नाही. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द अ‍ॅटक ऑफ 26/11’ या चित्रपटाने त्याला पुन्हा पूर्वीचे दिवस दाखवले आहेत.

‘सत्या-2’ एप्रिलमध्ये
1998 मध्ये रामूने मनोज वाजपेयी, जे. डी चक्रवर्ती आणि ऊर्मिला मातोंडकर यांना घेऊन ‘सत्या’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्या वेळी दोन कोटी रुपये बजेट असलेल्या या चित्रपटाने तब्बल 15 कोटींची कमाई केली होती. त्यामुळे रामू पुन्हा एकदा ‘सत्या-2’ तयार करत असून हा चित्रपट एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार आहे. यात सर्व कलाकार नवीन असणार आहेत.