आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनीषा म्हणते, 'रणबीर माझ्यासाठी परफेक्ट भाऊ'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलीवूडमध्ये सलमान खान, शाहरुख खान, आमिर खानसारख्या अभिनेत्यांबरोबर अभिनेत्री मनीषा कोईरालाने अनेक सिनेमांत काम केले आहे. सध्या मनीषा रणबीर कपूरच्या कामाने खूप प्रभावित आहे. दिल्लीतील एका कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर मनीषाने सांगितले की, 'मी रणबीरचे सिनेमे पाहिले आहेत. तो चांगला अभिनेता आहे. मला असे वाटते की तो माझा ऑन-स्क्रीन भाऊ बनण्यासाठी एकदम परफेक्ट आहे.' चित्रपटसृष्टीतील युवा कलावंतांबाबत विचारले असता, बर्‍याच अभिनेत्रींची काम मला चांगले वाटते, असे तिने सांगितले. अनुष्का शर्मा, परिणीती चोप्रा, सोनाक्षी सिन्हापासून ते सोनम कपूरपर्यंत सर्वच अभिनेत्री खूप मेहनती असून दमदार कलावंत आहेत.