आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणबीर करणार ‘आमीन’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘शैतान’ आणि ‘डेव्हिड’ सारख्या सिनेमांचा दिग्दर्शक बिजॉय नाम्बियार आता रणबीर कपूरसोबत ‘आमीन’ या मल्याळम सिनेमाचा रिमेक बनवणार आहे. दक्षिणेचा दिग्दर्शक लिजो जोसचा हा सिनेमा तेथे सर्वात जास्त पसंत करण्यात आला. बॉक्स ऑफिसवरदेखील या सिनेमाने चांगली कमाई केली. ‘आमीन’च्या हिंदी आवृत्तीत नाम्बियार काही बदल करणार आहेत. गोव्याच्या पार्श्वभूमीवर बनणार्‍या या सिनेमासाठी रणबीरसोबत चर्चा सुरू आहे. रणबीरनेदेखील सिनेमासाठी जवळजवळ होकार दिल्याचे बोलले जात आहे.