आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणबीर देणार अमेरिकेत लेक्चर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता रणबीर कपूरला बॉलिवूडमध्ये स्थापित होऊन जास्त वेळ झाला नाही. मात्र, ‘बर्फी’ सिनेमाने त्याला मोठय़ा कलावंतांच्या यादीत उभे केले आहे. म्हणूनच त्याला अमेरिकेच्या येल विद्यापीठाने लेक्चर देण्यासाठी बोलावले आहे. सूत्रांच्या मते, सिनेमातील बारकावे या विषयावर रणबीर या विद्यापीठात लेक्चर देणार आहे. अमेरिकन एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये रणबीरचे हे व्याख्यान 8 एप्रिलला होणार आहे. विदेशातील एखाद्या विद्यापीठात व्याख्यान देणारा रणबीर बॉलिवूडचा दुसरा कलाकार ठरला आहे. याआधी 2012 मध्ये शाहरुख खानने येल विद्यापीठात व्याख्यान दिले होते.