आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इम्तियाजच्या ‘हायवे’ला रणबीरचा मदतीचा हात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रणबीर कपूरने शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या ‘हायवे’ चित्रपटाचा प्रचार करण्यास मदत केली आहे. वास्तविक रणबीरचा अनुराग कश्यपसोबतचा ‘बॉम्बे वेलवेट’ लवकरच प्रदर्शित होत आहे. ‘हायवे’ चित्रपटाशी रणबीरचा काडीमात्र संबंध नाही. आलिया भट्ट आणि रणदीप हुडा या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. तरीही रणबीरने या चित्रपटाचा प्रचार केला आहे. त्याने एका टीव्ही चॅनेलच्या माध्यमातून रणदीप आणि आलियाची मुलाखत घेतली. हे त्याने फक्त इम्तियाज अलीच्या सर्मथनासाठी केले होते.
2011 मधील ‘रॉकस्टार’ चित्रपटामुळे रणबीरच्या करिअरला एक नवी दिशा मिळाली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन इम्तियाज अलीने केले होते. तेव्हापासून या दोघांमध्ये खास मैत्री निर्माण झाली होती. ‘रॉकस्टार’ नंतर दोघांनी जरी सोबत काम केले नसले तरीदेखील त्यांची मैत्री जपण्यासाठी रणबीर इम्तियाज अलीच्या चित्रपटाच्या प्रचारात उतरला.