आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘रॉय’ मध्ये रणबीरचा ‘नो रोमान्स’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'सांवरिया'पासून ते 'ये जवानी है दिवानी'पर्यंत रणबीर कपूर बॉलिवूडच्या टॉप नायिकांसोबत रोमान्स करताना दिसला. मात्र, आता आपल्या आगामी सिनेमात तो चक्क रोमान्स करताना दिसणार नाही.

आम्ही बोलतोय ते रणबीरच्या आगामी ‘रॉय’ या सिनेमाबद्दल. या सिनेमात रणबीर कपूर लीड रोलमध्ये झळकणार आहे. रणबीरसोबत या सिनेमात अर्जुन रामपाल आणि जॅकलिन फर्नांडिस आहेत. विशेष म्हणजे सिनेमात रामपालसोबत जॅकलिनची जोडी आहे आणि रणबीर कपूरला एकही जोडीदार नाही. सूत्रानुसार रणबीर या सिनेमात सोलो भूमिका साकारणार आहे. मात्र, या कहाणीत एक वेगळे वळणही आहे, जॅकलिनची यात दुहेरी भूमिका असल्याची चर्चा आहे.