आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : रणबीर म्हणतो, 'आय अ‍ॅम द बेस्ट...'

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

2007 मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या ‘सांवरिया’ सिनेमातून आपल्या अभिनयाची सुरुवात करणार्‍या रणबीर कपूरने फिल्मफेअरपासून ते स्टारडस्ट अवॉर्ड सोहळ्यात अनेक पुरस्कार आपल्या नावी केले आहेत. अनुराग बसू दिग्दर्शित ‘बर्फी’ सिनेमासाठी रणबीरला हा बहुमान मिळाला. यंदाच्या सर्वच पुरस्कार सोहळ्यात हा सिनेमा सर्वोत्कृष्ट ठरला आहे. ‘बर्फी’मुळे रणबीरचे सिनेमा निवडण्याचे कौशल्य कळते.

कमर्शिअल सिनेमा निवडण्याबरोबरच तो सिनेमातील भूमिकेला जिवंत करतो. त्यामुळेच त्याची तुलना आमिर खानसोबत केली जात आहे. आमिरप्रमाणेच रणबीरसुद्धा क्वांटिटीऐवजी क्वालिटीवर विश्वास ठेवतो. त्यामुळे बॉलिवूडमधील प्रत्येक बॅनर रणबीरला घेऊ इच्छित आहे. रणबीर मात्र विचारपूर्वकच सिनेमा साइन करतोय.

याविषयी रणबीर म्हणतो की, मनाला जी कथा आवडते तीच मी निवडतो. यामध्ये दिग्दर्शकालाही तो महत्त्व देतो. 'बर्फी'च्या कथेमध्ये त्याला वेगळेपणा दिसला म्हणून हा सिनेमा निवडला. आज आम्ही तुम्हाला रणबीरविषयीच्या काही खास गोष्टी सांगत आहोत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि रणबीरचे खास गुण कोणते ते जाणून घ्या...