आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘जग्गा जासूस’मध्ये रणबीर- कॅटरिनाचा रोमान्स मिळणार पा‍हायला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - काही महिन्यापूर्वी एका मासिकात अर्धनग्न छायाचित्रे छापून आल्याने चर्चेत आलेली बॉलीवूडची हॉट जोडी रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ पुन्हा एकदा दिग्दर्शक अनुराग बसू यांच्या ‘जग्गा जासूस’ या चित्रपटात रोमान्स करताना दिसणार आहेत.

स्पेन टूरवर असताना कॅटरिनाचे रणबीरसोबत बिकिनीतील छायाचित्र प्रकाशित झाल्याने बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली होती. त्यानंतर संतापलेल्या कॅटरिनाने माध्यमांना खुले पत्र लिहून कोणाच्याही खासगी आयुष्यात दखल न देण्याची सूचना केली होती. मात्र, रणबीर त्यावर काहीही बोलला नव्हता, तर दुसरीकडे आपले प्रेमसंबंध जगजाहीर करण्यासाठी या जोडीने असे केल्याचे बोलले जात आहे.

अनुरागने रणबीरसोबत ‘बर्फी’ हा चित्रपट केला. या चित्रपटाने रुपेरी पडद्यावर चांगले यश मिळवले होते. यातील रणबीरच्या अभिनयानाचे समीक्षकांसह सर्वांनी कौतुक केले होते. यात प्रियंका चोप्राही विशेष भाव खाऊन गेली होती. त्यानंतर रणबीर आणि अनुराग यांची चांगली गट्टी जमली आहे. ‘जग्गा जासूस’ चित्रपटाची काही दिवसांपूर्वी बसू यांनी घोषणा केली. यात प्रियंका चोप्रालाही घेण्याचे ठरले होते. मात्र, ऐनवेळी या चित्रपटात कॅटरिनाची वर्णी लागल्याचे सूत्रांनी सांगितले. रणबीर आणि कॅटरिनाने यापूर्वी ‘अजब प्रेम की गजब प्रेमकहानी’ आणि ‘राजनीती’ हे चित्रपट केले आहेत. बॉक्स ऑफिसवर दोन्ही चित्रपटांनी चांगली कमाई केली आहे. या दोघांचे प्रेमप्रकरण सध्या बहरात असल्याची बॉलीवूडमध्ये चविने चर्चा केली जात आहे. त्यामुळे अनेक निर्माते या दोघांना आपल्या चित्रपटात साइन करण्यासाठी धडपड करत आहेत. आता ‘जग्गा जासूस’मध्ये ऑफ स्क्रीन केमिस्ट्री पडद्यावर दिसेल की नाही हे तर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल.