आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला पत्रकारासोबत रणबीरचे गैरवर्तन, कॅमेरा हिसकावून केली बाचाबाची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूडचा यंग सुपरस्टार रणबीर कपूर आपल्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याला जेंटलमन व्यक्ति म्हणून ओळखलं जातं. मात्र 5 डिसेंबरच्या रात्री रणबीर आपल्या चुकीच्या वागणूकीमुळे चर्चेत आला. रणबीर आपल्या काही मित्रांसह मुंबईतील ऑलिव बारमध्ये गेला होता. तो बाहेर पडल्यानंतर काही पत्रकार आणि फोटोग्राफरने त्याच्याभोवती गराडा घातला. कारमध्ये बसलेल्या रणबीरने त्यावेळी एका महिला पत्रकारासोबत गैरवर्तन केले.
रणबीरने महिला पत्रकाराचा कॅमेरा हिसकावून घेतला आणि तो परत करण्यास नकार दिला. रणबीरच्या अशा वागणूकीमुळे त्या महिला पत्रकाराने आपल्या वरिष्ट सहका-याला फोन लावून घडलेली हकीकत सांगितले. मात्र या प्रकरणावर शांत राहण्याचा सल्ला तिला देण्यात आला.
ही घटना घडली तेव्हा रणबीरसोबत त्याचा बेस्टफ्रेंड अयान मुखर्जीसुद्धा हजर होता. त्यावेळी अयान कार चालवत होता आणि रणबीर त्याच्या शेजारी बसला होता. फोटोग्राफर्स रणबीरची छायाचित्रे घेत असताना त्या महिला पत्रकारासोबत रणबीरचा वाद झाला.
रिपोर्टर आपल्या कारने रणबीरची कार फॉलो करत होती. तेव्हा रणबीरने तिला म्हटले, की हिंमत असेल तर माझ्यासोबत रेस लाव.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा यावेळी क्लिक करण्यात आलेली रणबीरची छायाचित्रे...