आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranbir Kapoor And Deepika Podukone To Work Ayan Mukherji's Next

दीपिकाला 'सुपरहीरो'मध्ये कास्ट करण्यासाठी रणबीरने धरला दिग्दर्शकाकडे हट्ट!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता रणबीर कपूर आणि दिग्दर्शक अयान मुखर्जी यांच्या मैत्रीचे संबंध खूपच चांगले आहेत. दोघेही एकाच वयाचे असल्याने खासगी आणि व्यवसायिक आयुष्यातील सर्वच गोष्टी एकमेकांजवळ शेअर करतात. 2009मध्ये रिलीज झालेल्या 'वेकअप सिड' आणि 'ये जवानी है दीवानी'नंतर त्यांची मैत्री जास्तच घट्ट झाली.
'ये जवानी...'ने 50 कोटी रुपयांमध्ये बनवला होता आणि या सिनेमाने 300 कोटींची कमाई केली. मागील वर्षी कोटींची कमाई करणा-या सिनेमांमध्ये या सिनेमाचा सामावेश केला गेला. या सिनेमानंतर दोघांनी पुन्हा एकदा एक मोठा प्रोजेक्ट हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
हा एक मोठा सिनेमा असल्याचे सांगितले जात आहे. त्यात सुपरहीरो म्हणून रणबीर कपूरच काम करणार आहे. अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी अयानची पहिली पसंत कतरिना कैफ आहे. 'ये जवानी...'साठी देखील सुरूवातील त्याने कतरिनाला निवडले होते. परंतु तारखांच्या कारणामुळे कॅटने या सिनेमासाठी नकार दिला होता. परंतु या सिनेमासाठी तिच्या होकाराचा त्याला विश्वास आहे. पण रणबीरची इच्छा आहे, की दीपिकाला या सिनेमामध्ये त्याची हिरोइन म्हणून घ्यावे.
सुत्रांनी सांगितले, की रणबीरने अयानकडे हट्ट धरला आहे की दीपिकाला या सिनेमासाठी कास्ट करण्यात यावे. अयानला रणबीर-कतरिनाची जोडी या सिनेमासाठी योग्य वाटते परंतु रणबीरच्या निर्णयामुळे तो सध्या गोंधळात आहे. रणबीर त्याच्यासाठी फक्त सिनेमाचा अभिनेता नसून सिनेमाच्या निर्मितीसाठीही तो त्याला मदत करणार आहे. त्याला कदाचित त्याचे रणबीरचे म्हणणे ऐकावे लागू शकते.