मुंबई - काही महिन्यांपूर्वी कतरिना कैफ आणि रणबीरचे कपूरचे हॉलिडे पिक्स लीक झाल्यानंतर हे दोघेही मीडियासमोर येण्यास टाळत होते. रणबीर आणि कतरिना जून-जुलैमध्ये एकत्र स्पेनमध्ये सुटी एन्जॉय करण्यासाठी गेले होते. तेव्हा एका मॅगझिनने दोघांची खासगी छायाचित्रे प्रकाशित केली होती. त्यामुळे बरीच खळबळ उडाली होती. रणबीर-कॅटच्या अफेअरची जोरदार चर्चा रंगायला सुरुवात झाली होती. तेव्हा कतरिनाने मीडियाला पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली होती.
हे प्रकरण शांत होईपर्यंत दोघेही मीडियासमोर येण्यास टाळत होते. मात्र आता कदाचित हे दोघेही आपले रिलेशनशिप उघड करण्याच्या विचारात दिसत आहेत. म्हणूनच 23 डिसेंबर रोजी मुंबईत अनुराग कश्यपच्या आगामी 'द वुल्फ' या सिनेमाच्या स्क्रिनिंगला दोघांनीही सोबत एन्ट्री घेतली.
रणबीर आणि कतरिना एकाच गाडीतून कार्यक्रमस्थळी पोहोचले. दोघेही एकमेकांची साथ एन्जॉय करत होते. कतरिना ब्लॅक कलरच्या गाऊनमध्ये खूप सुंदर दिसत होती.
यावेळी स्क्रिनिंगला रणबीर आणि कॅट यांच्याव्यतिरिक्त अनुष्का शर्मा, अरुणोद्य सिंह, अर्जुन कपूर, किरण राव, अयान मुखर्जी, नसीरुद्दीन शाह यांनीही हजेरी लावली होती. मात्र यासगळ्यांपेक्षा लाइमलाइटमध्ये आले ते रणबीर आणि कतरिना. या दोघांचे एकत्र येणे या स्क्रिनिंगचा हायपॉईंट ठरले.
पुढील स्लाईड्समध्ये बघा या स्क्रिनिंगची खास छायाचित्रे...