आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- रणवीर कपूर आणि कतरिना सध्या प्रसारमाध्यमांपासून स्वत:ला दुर ठेवण्याचा प्रयत्न करत होती. जुन-जुलै दरम्यान ही दोघे स्पेन मध्ये सोबत सुट्टया घालवतानाची खासगी छायाचित्रे एका मासिकाने छापली होती. त्यामुळे रणवीर आणि कतरिनामधील संबंधाबद्दल अफवा पसरवण्यात आल्या होत्या. याबद्दल कतरिनाने माध्यमांना एक पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती.
या संपूर्ण प्रकरणानंतर ही दोघे माध्यमांना सामोरी गेली. त्यांच्या रिलेशनशिप ला घेऊन उठणा-या अफवांविषयी त्यांना आता काही वाटत नाही. किंबहूना त्यांना आता अफवांची सवयच झाली आहे. त्यामुळे तर 23 डिसेंबर रोजी मुंबईमध्ये अनुराग कश्यपचा आगामी चित्रपट 'द वुल्फ' च्या स्क्रीनिंगवेळी 'कपल एंट्री' मारली. दोघेही एकाच कारमधून आली होती. कतरिना काळया गाऊनमध्ये सुंदर दिसत होती. एक दुस-यांच्या सहवासात दोघेही आनंदी दिसत होते.
शिवाय स्क्रीनिंग साठी अनुष्का शर्मा एक शॉर्ट ड्रेस परिधान करुन आली होती. त्यांच्याशिवाय अरुणोदय सिंह, अर्जुन कपूर, किरण राव, अयान मुखर्जी, नसुरुद्दीन शहा यांचीही उपस्थिती होती. परंतु रणबीर सोबत कॅट यांच्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.
पुढील स्लाइडवर पहा स्क्रीनिंगदरम्यानची आकर्षक छायाचित्रे...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.