आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranbir Kapoor Becomes Roadside Vendor, Sells \'Vada Pav\' On Pune Streets

...जेव्हा \'रॉकस्टार\' रणबीर रस्त्यावर विकायला लागला वडापाव, बघा छायाचित्रे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरुण धवनने भाजी विकल्यानंतर आणि सलमान खानने लोकांचे केस कापल्यानंतर आता रणबीर कपूर कसा मागे राहणार? अलीकडेच, रणबीर रस्त्यावर वडापाव विकताना दिसला. आता तुम्ही विचार करू नका, की रणबीरने कोणता नवीन उपक्रम करायला सुरूवात केली आहे. निमित्त एवढेच, की बॉलिवूड स्टार्स हे काम फक्त 'मिशन सपने' या रिअ‍ॅलिटी शोसाठी करत आहेत. ज्यामध्ये या स्टार्सना काम करून कोणत्याही गरजू व्यक्तीला मदत करायची आहे. त्यातून जी कमाई त्यांना मिळणार आहे ती त्या व्यक्तीला द्यायची आहे.
या शोमध्ये रणबीर कपूर पुण्याच्या डीवाय पाटिल कॉलेजमध्ये महाराष्ट्रातील सर्वात प्रसिध्द पदार्थ 'वडापाव' विकताना दिसला. आता रणबीर कपूर वडापाव विकत असल्यावर कोणालाही त्याच्या हातून तो पदार्थ खाण्याची इच्छा होणारच ना. रणबीर जेव्हा वडापाव विकत होता तेव्हा त्याच्याकडे ग्राहकांची रांग लागली होती.
रणबीरने या शोविषयी सांगितले, की 'मिशन सपने' या शोची थीमच आहे, की स्टार्सना एका दिवसासाठी एक सामान्य माणूस बनून काम करायचे आहे. रणबीरने वडापाव विकून जे काही पैसे कमवले, ते एका ट्रक चालकाच्या 10 वर्षाच्या मुलीच्या उपचारासाठी खर्च केले जाणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा पुण्याच्या रस्त्यावर रणबीरने कशाप्रकारे विकला वडापाव...