आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कतरिना आहे रणबीरची सहावी गर्लफ्रेंड, जाणून घ्या त्याच्या आधीच्या 5 गर्लफ्रेंड्सविषयी...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा मोस्ट एलिजिबल बॅचलर रणबीर कपूर कतरिना कैफच्या प्रेमात पडला असल्याच्या बातम्या सध्या गाजत आहेत. प्रत्येक मॅगझिन आणि चॅनलवर या दोघांच्या अफेअरच्या बातम्या सुरु आहेत. हँडसम ड्युड रणबीर आणि गॉर्जिअस कतरिना कैफ या जोडप्याची बॉलिवूडमध्येही जोरदार चर्चा होत आहे. त्यांचे एकत्र फिरायला जाणे असो, कतरिनाच्या वाढदिवसाची पार्टी असो किंवा आणखी काही... सगळ्या ठिकाणी हे जोडपे एकत्र दिसत आहे. कतरिनाने यंदाचा आपला वाढदिवससुद्धा रणबीरबरोबरच साजरा केला.

अलीकडेच स्पेन आणि दुबईत एकत्र सुटी एन्जॉय केल्यानंतर आता हे दोघे श्रीलंकेत एकत्र आहेत. बातमी तर अशीसुद्धा आहे, की यावेळी रणबीर आपल्या या रिलेशनशिपविषयी गंभीर असून लवकरच तो ऑफिशिअली आपले नाते कबूल करु शकतो.

तसे पाहता कतरिना आणि रणबीरचे हे पहिले प्रेम नाहीये. यापूर्वी कतरिनाचे नाव सलमान खानबरोबर जोडले गेले होते. या दोघांचे अफेअर जवळजवळ तीन वर्षे टिकले. सलमानबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर कतरिनाच्या आयुष्यात रणबीरची एन्ट्री झाली.

तर दुसरीकडे बॉलिवूडमध्ये रणबीरची इमेज 'आशिक आवारा'ची आहे. त्याचे कतरिनापूर्वी ब-याच जणींशी नाव जोडले गेले आहे. इंडस्ट्रीत पदार्पण केल्यापासून त्याची लव्ह लाईफ या ना त्या कारणाने चर्चेत आहे.

रणबीरच्या आयुष्यात आजवर अनेक तरुणी येऊन गेल्या. रणबीरच्या भूतकाळावर एक नजर टाकली असता, कतरिनापूर्वी त्याच्या आयुष्यात आजवर पाच तरुणी येऊन गेल्या आहेत. कतरिना त्याची सहावी गर्लफ्रेंड आहे.

स्लाईड्सच्या माध्यमातून एक नजर टाकुया कतरिनापूर्वी रणबीरचे नाव कोणकोणत्या अभिनेत्रींबरोबर जोडले गेले होते.