आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranbir Kapoor Getting 21 Crores Fees For Just 14 Days

14 दिवसांच्या शूटिंगसाठी रणबीर घेणार 21 कोटी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक‘सांवरिया’ सिनेमात फ्लॉप ठरलेल्या रणबीरचा आता मात्र चांगलाच भाव वधारला आहे. त्याने अलीकडेच एक सिनेमा साइन केला असून अवघ्या 14 दिवसांच्या चित्रीकरणासाठी त्याने 21 कोटी रुपये मानधन घेतले आहे. रणबीरने उमेश शुक्लाचा सिनेमा साइन केला आहे.

अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘ये जवानी है दीवानी’ मध्ये त्याला 100 दिवसाचे 17.5 कोटी मिळाले होते. तर सिनेमाच्या व्यवसायातही त्याला 25 टक्के भागीदारी मिळाली. म्हणजेच रणबीरला शंभर दिवसांचे 25 कोटी रुपये मिळाले. इतके मानधन घेणारा रणबीर पहिलाच कलाकार नाही तर अक्षय कुमारदेखील ‘शौकीन’ च्या रिमेकमध्ये 20 दिवसाच्या शूटिंगसाठी 45 कोटी घेत आहे.

‘ओ माय गॉड’साठीसुद्धा अक्षयने 15 दिवस काम करण्याचे 8 कोटी रुपये घेतले होते. खरं तर सिनेमाचा निर्माता स्वत: अक्षयच होता. त्यामुळे सिनेमा यशस्वी झाल्यावरदेखील त्याला आणखी फायदा झाला. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने ‘शक्ती द पॉवर’ (2002) मध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती. त्यात त्याने 9 दिवसांचे सव्वा कोटी रुपये घेतले होते. त्या वेळी तो एका सिनेमासाठी हीरो म्हणून सव्वा कोटी रुपये घेत होता.