आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranbir Kapoor Parties With Karan Johar, Arjun Kapoor Without Katrina

PICS: करण जोहरच्या पार्टीत कतरिनाची अनुपस्थिती, रणबीरने लपवला चेहरा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचे त्रिकूट अयान मुखर्जी, करण जोहर आणि रणबीर कपूर यांनी काल (10 फेब्रुवारी) एकत्र येऊन खूप धमाल-मस्ती केली. या धंमाल-मस्तीवेळी त्यांच्यासोबत 'गुंडे' सिनेमाचा अभिनेता अर्जून कपूरसुध्दा सामील होता. निमित्त होते पार्टीचे. ही पार्टी करणने त्याच्या मुंबई ब्रांद्राच्या परिसरात असलेल्या घरी आयोजित केली होती. पार्टीमध्ये अनेक स्टार्स आणि अभिनेते उपस्थित होते. परंतु विशेष घडले असे, की या पार्टीमध्ये रणबीर एकटाच आला होता त्याच्यासोबत कतरिना कैफ दिसली नाही. असे पहिल्यांदाच घडत आहे असे नाही यापूर्वीसुध्दा एका पार्टीत दोघे वेगवेगळे पोहोचले होते.
जेव्हा रणबीर पार्टीच्या ठिकाणी पोहोचला तेव्हा त्याला कॅमे-याचा सामना करावा लागला. त्यावेळी मात्र रणबीरने कॅमे-यासमोर येताच चेहरा झाकून घेतला. कारण त्याला वाटत होते की कोणी त्याला ओळखू नये. त्यावेळी त्याने 'धूम 3'ची टोपी घातलेली होती आणि त्याच टोपीने त्याने चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला.
काही दिवसांपूर्वी अशीही चर्चा केली जात होता, की आमिर खानची पत्नी किरण रावने काही दिवसांपूर्वी रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्यामध्ये पॅचअप करण्यासाठी अयान मुखर्जी आणि करण जोहरची एक खासगी भेट घेतली होती. परंतु आता सर्वांचा असा गोंधळ झाला आहे, की ही पार्टी रणबीर आणि कॅटचे पॅचअप करण्यासाठी ठेवण्यात आली होती की फक्त धमाल-मस्तीसाठी. कारण या पार्टीत कतरिना कुठेच दिसली नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा रणबीरने कसा लपवला चेहरा...