Home »Top Story» Randeep Hudda Gets Intimate With Two Hot Ladies

PHOTOS : 'मर्डर 3'मध्ये दोन अभिनेत्रींबरोबर रणदीपचे बोल्ड सीन्स !

भास्कर नेटवर्क | Jan 09, 2013, 11:56 AM IST

भट्ट कॅम्पच्या आगामी 'मर्डर 3' या सिनेमाचा ट्रेलर अलीकडेच लाँच करण्यात आला. या सिनेमात रणदीप हुड्डा, अदिती राव आणि मोनालिजा (मोनालिजाने आता आपले नाव बदलून सारा लॉरेन केले आहे.) प्रमुख भूमिकेत आहेत.
हा सिनेमा मर्डर आणि 'मर्डर 2' या सिनेमाचा सिक्वेल आहे. या दोन सिनेमांमध्ये इमरान हाश्मी प्रमुख भूमिकेत झळकला होता. मात्र आता 'मर्डर 3' मध्ये इमरानच्या जागी रणदीप हुड्डाची वर्णी लागली.

'मर्डर' आणि 'मर्डर 2' हे सिनेमे बोल्ड सीन्समुळे बरेच गाजले होते. आता 'मर्डर 3' मध्ये बोल्ड कटेंट नसून कसे चालेल. या सिनेमातही बोल्ड सीन्सचा भडीमार प्रेक्षकांना पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

रणदीपने सारा आणि अदितीबरोबर अनेक हॉट बेडरुम सीन्स सिनेमात दिले आहेत. सिनेमाच्या ट्रेलरमध्येही हे बोल्ड सीन्स दाखवण्यात आले आहेत. हा सिनेमा १५ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.

छायाचित्रांमध्ये पाहा या सिनेमाची छोटीशी झलक...

Next Article

Recommended