आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rani Mukerjee And Aditya Chopra’S Wedding Venue

LEAKED: व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी राणी-आदित्य चढणार बोहल्यावर, जाणून घ्या कुठे होणार लग्नसोहळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी आणि प्रसिध्द दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांनी लग्न केल्याची जोरदार चर्चा गेल्यावर्षीपर्यंत रंगत होती. मात्र आता बातमी आहे, की या दोघांनी गेल्या वर्षी लग्न केले नव्हते. यावर्षी हे दोघे बोहल्यावर चढणार असल्याचे कळते.
खरं तर दोघांपैकी कुणीही अद्याप त्यांच्या नात्याचा स्वीकार केलेला नाहीये. परंतु यांच्याविषयी माध्यमांमध्ये येणा-या बातम्यांवरून असे जाणवते आहे, की दोघे लवकरच पती-पत्नी म्हणून त्यांच्या चाहत्यांसमोर येतील. येत्या फेब्रुवारी महिन्यात दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला असल्याचे समजते.
खास गोष्ट आहे, की त्यांनी लग्नासाठी जोधपूरच्या उमेद भवन पॅलेसची निवड केली आहे आणि ही माहिती माध्यमांना मिळाली आहे. विशेष म्हणजे अशी चर्चा जोरात सुरू आहे, की दोघेही प्रेमाच्या दिवशी म्हणजेच व्हॅलेंटाईनच्या डेला लग्न करणार आहेत.
या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला राणी-आदित्यच्या नात्याविषयी आणि यांच्या लग्नाच्या नियोजनाविषयी सांगत आहोत...