आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड अभ‍िनेत्री राणी मुखर्जीचा लॉंग टाईम बॉयफ्रेंडसोबत झाला साखरपुडा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी आणि चित्रपट निर्माता आदित्य लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून माध्यमांमधून रंगवल्या जात होत्या. मात्र, आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. राणी आणि तिचा लॉंग टाईम बॉयफ्रेंड चित्रपट निर्माता आदित्य चोप्रा यांचा अखेर साखरपुडा झाला आहे.

'स्टारडस्ट मॅगझिन'च्या वृत्तानुसार दोघांनी साखरपुडा उरकवून घेतला असून येत्या जानेवारीमध्ये ते लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. राणी 2014 मध्ये जानेवारी महिन्यात लग्न करणार आहे. या लग्नाचा शुभमुहूर्त अद्याप ठरलेला नाही, पण आदित्यच्या आई पामेला चोप्रा लवकरच सगळ्यांना ही शुभवार्ता सांगणार आहेत.

राणी आणि आदित्यचे कुटूंबिय धार्मिक असल्याने दोघांचा विवाह रुढी-परंपरेनुसार होणार आहे.

पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करून जाणून घ्या, 'राणी- आदित्यची लव्हस्टोरी'