आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rani Mukherjee Will Be In Karan Johar Short Movie

करणच्या शॉर्ट फिल्ममध्ये राणी बिझी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करण जोहर सध्या एका शॉर्ट फिल्मवर काम करतोय. त्यात राणी मुखर्जी आणि रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत आहेत. अलीकडेच या सिनेमाचे चित्रीकरण मुंबईतील रस्त्यावर करण्यात आले. 'बॉम्बे टॉकीज' सिनेमाचे वेंचर म्हणून ही शॉर्ट फिल्म तयार केली जात आहे. करणच्या या शॉर्ट फिल्मसह जोया अख्तर, अनुराग कश्यप, दिबाकर बॅनर्जी यांच्याही शॉर्ट फिल्म्सचा यामध्ये समावेश आहे.
भारतीय सिनेमाला 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 3 मे रोजी बॉम्बे टॉकीज प्रदर्शित होणार आहे. शॉर्ट फिल्ममध्येच का होईना राणीला घेऊन करणने दाखवून दिले की ती आजही त्याच्या फेव्हरेट तारकांच्या यादीत आहे.