आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमल देईल रजनीकांतला सल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपला बहुप्रतीक्षित ‘कोचाड्यान’ हा सिनेमा पाहून त्याबाबत सल्ला देण्याची विनंती रजनीकांतने, मित्र आणि प्रतिस्पर्धी कमल हसनला केली आहे. हा सिनेमा रजनीकांतसाठी खूप महत्त्वाचा आहे. आजारपणामुळे दोन वर्ष सिनेमापासून लांब राहिल्यानंतर हा त्यांचा पहिला सिनेमा आहे. या सिनेमाची कहाणी एकदम नवी आणि यात मोशन कॅप्चर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याची चर्चा आहे. सिनेमात अनेक प्रसिद्ध तमिळ अभिनेत्यांचा अभिनय पाहायला मिळणार आहे. कमल हसनला सिनेमा निर्मितीची चांगली समज असल्याचे रजनीकांत यांना माहीत आहे. म्हणून त्यांनी आपल्या सिनेमाविषयी सल्ला देण्याची विनंती कमल हसनला केली आहे.