आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औषधीच्या गुंगीत बोललो...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माझ्या आणि दीपिकाविषयी माध्यमात जी चर्चा सुरू आहे, ती औषधीच्या गुंगीत दिलेल्या एका मुलाखतीमुळे झाल्याचे रणवीर सिंह म्हणाला आहे.
चित्रपट समीक्षक अनुपमा चोप्रा यांच्या टेलिव्हिजन शोमध्ये दीपिकासोबत चर्चा करताना रणवीर म्हणाला की, 'डेंग्यू झाल्यानंतर मी दवाखान्यातून नुकताच घरी आलो होतो आणि औषधीच्या नशेत होतो. त्यामुळे खूप काही बोलून गेलो. अशा अवस्थेत मुलाखत देऊ नका असे, मी दुसर्‍या कलावंतांना सांगेन.'
यावर दीपिका म्हणाली की, 'हा वेगळ्या विचाराचा माणूस आहे म्हणूनच मला याचे बोलणे पटते. कोणत्याही गोष्टीचा तो पश्चाताप करत नाही. मग ते कपडे घालणे असो की, काहीही बोलणे असो, किंवा इतरापेक्षा वेगळे असणे असो.' नंतर दोघांनी एकमेकांच्या डोळ्यात पाहून आम्ही एकमेकांना डेट करत नसल्याचे म्हटले.