आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranveer Singh And Deepika Podukone At Ramleela Screening

'रामलीला'च्या स्क्रिनिंगला अवरतलं तारांगण, PHOTOSमध्ये बघा दीपिकाची मस्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित 'रामलीला' हा सिनेमा आज (15 नोव्हेंबर) रिलीज होणार आहे. अलीकडेच दिल्ली उच्च न्यायालयाने या सिनेमाच्या रिलीजवर बंदी घातली होती. मात्र सिनेमाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या स्पष्टीकरणानंतर ही बंदी उठवण्यात आली.
सिनेमाच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत सिनेमामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता. सिनेमाच्या शीर्षकावरसुद्धा आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर सिनेमाचे शीर्षक बदलून 'गोलियों की रासलीला... रामलीला' असे ठेवण्यात आले आणि न्यायालयाने सिनेमाच्या प्रदर्शनाला हिरवा झेंडा दाखवला.
न्यायालयाने दाखवलेल्या हिरव्या झेंड्यानंतर सुटकेचा श्वास घेणा-या संजय लीला भन्साळी यांनी गुरुवारी उशीरा रात्री आपल्या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित केले होते. या स्क्रिनिंगला सिनेमातील मेन लीड साकारणारे रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण पोहोचले होते.
यावेळी दोघेही खूप आनंदात दिसले. व्हाईट गाऊनमध्ये दीपिका एखाद्या परीसारखी दिसत होती. यावेळी ती संजय लीला भन्साळी यांच्याबरोबर मस्ती करताना दिसली. फोटोग्राफर्ससमोर दीपिका संजय लीला भन्साळी यांचे गालगुचे घेताना दिसली.
रणवीर आणि दीपिका यांच्यासमवेत सिनेमात आयटम नंबर करणारी प्रियांका चोप्रासुद्धा येथे दिसली. याशिवाय मनीषा कोईराला, रणबीर कपूरचे पालक ऋषी कपूर आणि नीतू कपूरसह ब-याच सेलिब्रिटींनी या स्क्रिनिंगला हजेरी लावून चारचाँद लावले.
बघा या 'रामलीला'च्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या सेलेब्सची खास छायाचित्रे...