होय तुम्ही बरोबर वाचले आहे. बॉलिवूडचे लव्ह बर्ड्स रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांच्यात सध्याच्या काळात सार्वजनिक ठिकाणी जरा जास्तच जवळीक वाढलेली दिसत आहे. अलीकडेच जेव्हा एका फोटोग्राफरने या दोघांचे इंटीमेट क्षण आपल्या कॅमे-यात कैद करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा रणवीर सिंहचा चांगलाच पारा चढला आणि त्याने फोटोग्राफरला धक्काबुक्की केली.
ही घटना अहाना देओलच्या रिसेप्शन पार्टीत घडली होती. या पार्टीत रणवीर आणि दीपिकाला आमंत्रित करण्यात आले होते. पार्टीत हे दोघेही एकमेकांच्या खूप जवळ बसले होते. यावेळी एका फोटोग्राफरने या दोघांना इंटीमेट कंडीशनमध्ये पाहिले. जेव्हा तो फोटोग्राफर या दोघांची छायाचित्रे काढू लागला तेव्हा रणवीर त्याच्यावर भडकला. त्याने फोटोग्राफरला धक्काबुक्की केल्याचे वृत्त आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या याविषयी बरंच काही...