आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी अभिनेत्री होत्या तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता, बघा त्यांचे RARE PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तमिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि माजी अभिनेत्री जयललिता आज 65 वर्षांच्या झाल्या आहेत. 24 फेब्रुवारी 1948ला त्यांचा जन्म मेलुकोट, कर्नाटकमध्ये झाला होता. त्यांचे पूर्ण नाव जयललिता जयराम आहे. त्या 1991पासून ते आजपर्यंत तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आहेत .
मुख्यमंत्री पदावरील त्यांचा कार्यकाळ अशाप्रकारे
24 जून 1991पासून 12 मे 1996पर्यंत
14 मे 2001पासून 21 सप्टेंबर 2001पर्यंत
2 मार्च 2002पासून 12 मे 2006पर्यंत
16 मे 2011पासून ते आतापर्यंत
अभिनेत्रीच्या रुपात त्यांच्या करिअरची सुरूवात
जेव्हा त्या 15 वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांच्या आईने त्यांना सिनेमात काम करण्यासाठी प्रेरित केले होते. याच वयात त्यांनी कन्नड भाषेतील Chinnada Gombe'(1964)मध्ये काम केले. त्याच्या पुढील वर्षी त्यांनी 1965मध्ये तमिळ सिनेमामध्ये 'Vennira Aadai' दमदार अभिनय केला. याच वर्षी त्यांनी एका तेलगू 'Manushuru Mamathalu' सिनेमामध्येही काम केले.
जयललिता यांनी त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये एकुण 130 सिनेमे केले आहेत. 1961मध्ये इंग्रजी 'Episite'पासून अभिनयाच्या जगात दमदार पाऊल ठेवणा-या जयललिता यांनी 1980पर्यंत सतत दाक्षिणात्य सिनेमांत काम करून दाक्षिणात्य इंडस्ट्रीवर राज केला. दाक्षिणात्य सिनेमात स्कर्ट घालण्याचा ट्रेंड जयललिता यांनीच सुरू केला. सर्वात पहिले त्यांनीच दाक्षिणात्य सिनेमात स्कर्ट घालायला सुरूवात केली होती.
बॉलिवूडमध्ये एकच सिनेमा केला
जयललिता यांनी फिल्मी करिअरमध्ये अनेक भाषांच्या सिनेमात काम केले. त्यांनी विशेष म्हणजे, तमिळ, तेलगू आणि कन्नड सिनेमांमध्ये काम केले आणि त्यांना त्यासाठीच ओळखले जात होते. परंतु 1968मध्ये त्यांनी 'इज्जत' या बॉलिवूड सिनेमात काम केले. या सिनेमात धर्मेंद्र त्यांच्यासोबत मुख्य भूमिकेत होते.
तीनवेळा मिळाला आहे फिल्मफेअर अवॉर्ड
जयललिता यांना दाक्षिणात्य सिनेमांच्या सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये मोजले जाते. त्यांना दमदार अभिनयासाठी तीनवेळेस फिल्मफेअरचा उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काने सन्मानित करण्यात आले आहे. पहिला फिल्मफेअर त्यांना शिवाजी गणेशन यांच्या 'Pattikada Pattanama'(1971) सिनेमासाठी मिळाला होता. याचवर्षी 'तेलगू श्री कृष्ण सत्य' या सिनेमासाठी त्यांना दुसरा फिल्मफेअर मिळाला होता. 1973मध्ये तमिळ सिनेमा Suryakanthi'साठी त्यांना तिस-या फिल्मफेअर सिनेमाने सन्मानित करण्यात आले होते.
राजकारणात केला प्रवेश
सांगितले जाते, की 1977मध्ये तमिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री रामचंद्रन यांनी जयललिता यांना राजकारणात आणले होते. परंतु जयललिता या गोष्टीला नाकारतात. 1982मध्ये त्यांनी रामचंद्रन यांच्या 'ऑल इंडिया अन्ना ड्रविड़ मुनेत्र कझगम' (AIADMK) पार्टीत प्रवेश केला होता. 1983मध्य त्यांना प्रचार समितीचे सचिव बनवले होते. याचवर्षी पहिल्यांदा तिरुचेंदर विधानसभाच्या सीटवरून त्या आमदार पदावर निवडून आल्या.
जयललिता यांना इंग्रजी भाषा अवगत असल्याने रामचंद्रन यांची इच्छा होती, की जयललिता यांनी राज्यसभेत यावे. 1984पासून 1989पर्यंत त्यांनी त्यांची राज्यसभा संसदमध्ये एक जागा बनवली होती. 1989मध्ये जयललिता यांनी तमिळनाडू विधानसभेमध्ये अपक्षच्या रुपात स्वत: जबाबदारी संभाळली. 24 जूनला पहिल्यांदा राज्याच्या मुख्यामंत्री पदावर निवडून आल्या.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जयललिता यांच्या वाढदिवसानिमित्त बघा त्यांची काही न पाहिलेली आणि पाहिलेली छायाचित्रे...