आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूडमध्ये 'दबंग' नावाने ओळखल्या जाणा-या सलमान खानचा आज वाढदिवस आहे. सलमानचा जन्म 27 डिसेंबर 1965 ला झाला. त्याच्या वडीलाचे नाव सलीम खान असून त्याच्या आईचे नाव हेलन आहे्. सलमानचे दोन भाऊ अरबाज आणि सोहेल हे अभिनेत्याबरोबर चित्रपट निर्मातेसुध्दा आहेत. तसेच त्याला दोन बहिनी आहेत. अलविरा आणि अर्पिता त्यांची नावे आहेत.
1988 मध्ये सलमानने सहायक अभिनेता म्हणून चित्रपटात काम करायला सूरुवात केली.'बीवी हो तो ऐसी' हा त्याचा पहिला सिनेमा होय. 1989 मध्ये त्याचा पहिला चित्रपट 'मैने प्यार किया' रिलीज झाला. तेव्हापासून ते आजतागायत 'बॉडीगार्ड'पर्यंत सलमान बॉलीवूडमधील एक लोकप्रिय अभिनेता राहिला आहे.
'मैने प्यार किया' या चित्रपटातील भूमिकेसाठी सलमानला नवोदित पुरुष अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. 'अंदाज अपना अपना' या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने कॉमेडीने प्रेक्षकांच्या ह्दयावर अधिराज्य गाजवले. त्यानंतर आलेल्या 'करण अर्जून' मधून त्याने एक्शनपटाला सुरुवात केली.
चला तर मग बॉलीवूडच्या या दबंगला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्याची खास छायाचित्र पहा पुढील स्लाइडवर...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.