आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बघा बॉलिवूडच्या शो मॅनची दुर्मिळ छायाचित्रे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगम, आवारा, मेरा नाम जोकर असे एकाहून एक हिट सिनेमे देऊन 80, 90 चे दशक सुवर्ण करणारे राज कपूर यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या स्मृती त्यांच्या अनेक सिनेमांत आजही बंदिस्त आहेत. राज कपूर यांनी अवघ्या देशातील सिनेरसिकांना दर्जेदार मनोरंजन दिले. राम तेरी गंगा मैली, सत्यम शिवम सुंदरम, बॉबी, संगम, श्री ४२०, जिस देस मी गंगा बेहती हें, अंदाज, नील कमल या सिनेमांचे यशस्वी दिग्दर्शन राज कपूर यांनी केलं होते. हिंदी सिनेमाचा शो मॅन म्हणून ओळखले जाणारे राज कपूर हिंदी सिनेमातील एक मैलाचा दगड ठरले.
राज कपूर यांचा जन्म 14 डिसेंबर 1924 रोजी पाकिस्तानात झाला. राज कपूर यांचे वडिल पृथ्वीराज कपूरसुद्धा एक सुप्रसिद्ध अभिनेते होते. राज कपूर अभिनेत्यासोबतच उत्कृष्ठ दिग्दर्शक आणि निर्माता होते. त्याचप्रमाणे भाऊ शम्मी कपूर आणि शशी कपूर हे देखील प्रसिद्ध अभिनेते आहेत.
आर.के. स्टुडीओ सुरु करून कपूर कुटुंबाने अनेक सिनेमे अजरामर केले. वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी राज कपूर यांनी मुंबर्इत 'आर. के. फिल्म्सची' स्थापना केली.
राज कपूर यांना सिनेसृष्टीतील त्यांच्या अमुल्य योगदानासाठी चित्रपसृष्टीच्या सर्वोच्च मानाचा समजल्या जाणा-या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. याशिवाय 1971 साली भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता. या महान अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्मात्याने 2 जून 1988 रोजी या जगाचा निरोप घेतला.
आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बघुया त्यांची दुर्मिळ छायाचित्रे...