आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चित्रपटाबाबतचे निर्णय माझे मीच घेते - परिणिती चोप्रा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - चित्रपट निवडण्यासाठी मला कोणाचीही मदत लागत नाही. माझे निर्णय मीच स्वत:च घेते. चुलत बहीण अभिनेत्री प्रियंका चोप्रा मला कामात कधीही मदत करत नसल्याचे मत अभिनेत्री परिणिती चोप्रा हिने नुकत्याच एका मुलाखतीत व्यक्त केले.


परिणिती सध्या यश राज फिल्म्सचा ‘शुद्ध देसी रोमान्स’ हा चित्रपट करत आहे. तिच्यासोबत सुशांतसिंग राजपूत आणि वाणी कपूर आहेत. मुलाखतीत ती म्हणाली, माझा पहिला चित्रपट हा स्वत: प्रयत्न केल्यामुळे मिळाला. मला स्वत:हून दुय्यम भूमिका स्वीकारायला आवडतात नाही. त्यामुळे दिग्दर्शकांना मी जर योग्य वाटत असेल तर ते माझ्याकडे आपणहून येतील. मला त्यांच्याकडे जाण्याची गरज नाही. प्रियंका मला मोठी बहीण म्हणून अनेक कामांत मदत करत असते. मात्र, चित्रपटाबाबत माझे निर्णय मीच घेते. प्रियंका बॉलीवूडमध्ये असल्याने माझ्यात खुप आत्मविश्वास निर्माण होतो. एखाद्या व्यक्तीबाबत शंका वाटल्यास तिचा सल्ला जरूर घेते. आमच्या कुटुंबाला चित्रपटसृष्टीची काहीही पार्श्वभूमी नाही. मी आणि प्रियंकाने आमचे करीअर स्वत: घडवले आहे. त्यामुळे या क्षेत्राशी संबंध नसतानाही मोठे यश मिळवणे हे अभिमानास्पद असल्याचे ती म्हणाली. परिणितीने ‘लेडिज व्हर्सेस रिकी बहल’, ‘इश्कजादे’ हा चित्रपट केला आहे. मात्र, दोन्ही चित्रपटात तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. सध्या तिच्याकडे ‘हसे तो फसे’, ‘किल दिल’ आणि हबीब
फैसल यांचा एक चित्रपट आहे.


प्रियंकासोबत टक्कर
परिणिती चोप्रा, सुशांतसिंग राजपूत आणि वाणी कपूर यांचा ‘शुद्ध देसी रोमान्स’ हा चित्रपट 6 सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी प्रियंका चोप्रा आणि रामचरण यांची भूमिका असलेला ‘जंजीर’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे बहिणी-बहिणीची टक्कर या निमित्ताने पाहण्यास मिळणार आहे.