आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rekha And Amitabh Bachchan Caught In The Same Flight

रेखा-अमिताभने केला एकाच फ्लाईटमधून प्रवास, या छायाचित्रामधून झाले उघड !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडची चर्चित ऑनस्क्रिन जोड्यांमधली एक जोडी म्हणजे अमिताभ बच्चन आणि रेखा. या दोघांनी कधीही खासगी आयुष्यातील आपले नाते सार्वजनिकरित्या स्वीकारले नाही.
या दोघांनी अनेक सिनेमांत एकत्र काम केले. रेखामुळे अमिताभ यांना आपल्या खासगी आयुष्यात अडचणी नको होत्या, त्यामुळे त्यांनी तिच्यापासून दूर राहणे पसंत केले.
सार्वजनिक ठिकाणीसुद्धा अमिताभ रेखापासून दूरच असतात. अशातच जर हे दोघे एकाच फ्लाईटमध्ये नजरेस पडले तर ती मोठी बातमी बनते.
अलीकडे काहीसे असेच घडले. बिग बी आणि रेखा एकाच फ्लाईटमधून प्रवास करताना दिसले. झालं असं, की हे दोन्ही स्टार्स भारतीय सिनेसृष्टीला शंभर वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने चेन्नईत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी एकाच फ्लाईटने तिथे जात होते.
जेव्हा फ्लाईटमधील पायलटने बिग बींबरोबर फोटो काढले, तेव्हा त्यांच्यामागे बसलेली रेखासुद्धा कॅमे-यात कैद झाली. त्यामुळे बिग बी आणि रेखा एकाच फ्लाईटने प्रवास करत असल्याचे उघड झाले.
पुढील स्लाईड्समध्ये बघा सिनेमांतील दोघांच्या जबरदस्त केमिस्ट्रीची खास झलक...