आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

58 वर्षीय रेखाचे मोठ्या पडद्यावर लवकरच कमबॅक, डान्स नंबरवर थिरकणार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब-याच वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून लांब असलेली रेखा पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. इंद्र कुमार यांच्या आगामी 'सुपरनानी' या सिनेमात रेखा महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. 58 वर्षीय रेखा या सिनेमात अभिनेता शर्मन जोशीच्या आजीच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे रेखा या सिनेमात डान्स नंबरवर थिरकताना दिसणार आहे. येत्या 25 जानेवारीला हा डान्स नंबर रेखावर चित्रीत करण्यात येणार आहे. शबीना खान हे गाणे कोरिओग्राफ करणार आहे.
हा सिनेमा महिला सशक्तीकरणावर आधारित असून एक नातू आपल्या आजीला आयुष्यात काही तरी चांगले करण्यासाठी प्रेरित करतो. या सिनेमात रेखाबरोबर शर्मन जोशी आणि अनुपम खेर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.