आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rekha Touched Jaya Bachchan’S Feet At Screen Awards

स्क्रिन अवॉर्डमध्ये रेखा चक्क जया बच्चन यांच्या पाया पडल्या...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलीकडच्या काळात मुंबईत रंगलेल्या स्क्रिन अवॉर्ड सोहळ्यात उपस्थितांना दोन दुर्मिळ क्षणांचे साक्षीदार होण्याची संधी मिळाली होती. पहिला क्षण म्हणजे बिग बी तब्बल 33 वर्षांनी रेखा यांना सार्वजनिकरित्या भेटताना दिसले. तर दुसरा दुर्मिळ क्षण म्हणजे जया बच्चन यांनीही रेखा यांची विशेष भेट घेऊन त्यांनी नेसलेल्या साडीचे कौतुक केले. यावेळी रेखा जया बच्चन यांच्या चक्क पाया पडताना दिसल्या. या आगळ्या भेटीचे साक्षीदार ठरलेल्या समस्त रसिकांनी हा क्षण मोबाइल, कॅमेर्‍यात टिपून घेतला.
स्क्रीन अवॉर्ड सोहळ्यात मान्यवरांच्या रांगेत अभिनेत्री रेखा बसल्या होत्या. समारंभस्थळी आल्यानंतर अमिताभ स्वत: होऊन रेखा यांच्याकडे गेले. त्यांना नमस्कार केला. रेखा यांनीही हसून प्रतिसाद दिला. जया बच्चन यांनीही रेखा यांची भेट घेतली. त्या दोघींनी तसेच अमिताभ यांनीही रेखासमवेत आवर्जून छायाचित्रे काढून घेतली. अमिताभ-रेखा यांची मैत्री जया यांना आवडत नसल्याने बच्चन परिवार रेखा यांना टाळत असल्याचे चित्र अनेक समारंभांमधून दिसले. अमिताभ आणि रेखा हेदेखील भेटले तरी कधी एकमेकांना बोलताना दिसले नाहीत. या पार्श्वभूमीवर या भेटीमुळे त्यांच्यातील कटुता कमी झाल्याचे म्हटले जात आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा स्क्रिन अवॉर्ड सोहळ्यात क्लिक झालेली बिग बी, जया बच्चन आणि रेखा यांची छायाचित्रे...