आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'Ragini MMS 2': पाहा सनीच्या सिनेमाचे NEW POSTER

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पोर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास करणारी अभिनेत्री सनी लियोन हिच्या आगामी 'रागिनी एमएमएस 2' या सिनेमाचे नवीन पोस्टर 4 मार्च रोजी रिलीज करण्यात आले. यापूर्वी या सिनेमाचे दोन पोस्टर रिलीज करण्यात आले होते.
भूषण पटेल दिग्दर्शित हा सिनेमा येत्या 21 मार्चला रिलीज होतोय. बालाजी मोशन पिक्चर्स आणि ऑल्ट एन्टरटेन्मेंच्या बॅनरमध्ये तयार झालेल्या या सिनेमाच्या एकता कपूर आणि शोभा कपूर निर्मात्या आहेत.
सिनेमात सनी लियोनसह साहिल प्रेम, परवीन डबास, संध्या मृदुल, अनीता हसनंदानी आणि करण तलुजा यांच्याही मुख्य भूमिका आहेत. 2011मध्ये रिलीज झालेल्या 'रागिनी एमएमएस' या हॉरर सिनेमाचा हा सिक्वेल आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा यापूर्वी रिलीज झालेल्या या सिनेमाच्या पोस्टरची खास झलक...