Home »Top Story» Remo D'souza To Copyright Dance Sequences From ABCD

डान्स स्टेप्स कॉपीराइट करणार रेमो

दिव्य मराठी वेब टीम | Jan 09, 2013, 11:35 AM IST

  • डान्स स्टेप्स कॉपीराइट करणार रेमो

बॉलिवूडचा कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसुजा आपल्या आगामी एनीबडी कॅन डान्स (एबीसीडी) मधील डान्स सिक्वेंसचे कॉपीराइट करणार आहे. रेमो या सिनेमातील गाणे ‘बेजुबान..’ चे काही स्टेप्स कॉपीराइट करणार आहे. याविषयी रेमोने सांगितले की, एखाद्या सिनेमाच्या स्क्रिप्टचे कॉपीराइट होऊ शकते तर मग गाण्यातील नृत्याच्या स्टेप्सचे कॉपीराइट का होऊ शकत नाही. हे गाणे ‘डान्स इंडिया डान्स’ चा विजेता सलमान खान आणि धर्मेशवर चित्रित करण्यात आले आहे. याबरोबरच अमेरिकन रिअ‍ॅलिटी शो ‘सो यू थिंक कॅन डान्स’ चा विजेता लॉरेनसुद्धा या सिनेमात आहे. हा सिनेमा 8 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.

Next Article

Recommended