आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिलीजपूर्वीच सिक्वेलची तयारी सुरु

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेमो डिसूजाचा 'एबीसीडी' हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. हा सिनेमा देशातील पहिला थ्रीडी डान्स सिनेमा आहे. विशेष म्हणजे सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच रेमो त्याच्या सिक्वेलच्या तयारीला लागला आहे. या नवीन सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे सिक्वेलमध्ये कोणत्याही बड्या स्टार्सला घेण्याऐवजी रेमो वेगवेगळ्या शहरात ऑडीशन्स घेऊन कलाकारांची निवड करणार आहे. मात्र हे कलाकार उत्तम डान्सर्स असणे गरजेचे आहे. ही निवड भोपाल, इंदूर समवेत देशाच्या इतर शहरातून केली जाईल. रेमो जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात भोपाल आणि इंदूरला जाणार आहे आणि येथील लोकल डान्सर्स निवडणार आहे.

‘एबीसीडी’ चा सिक्वेल लोकल डान्सर्सवर आधारित असणार आहे. त्यामुळे रेमो आणि त्याची टीम देशाच्या वेगवेगळ्या राज्यांतून डान्सर्स निवडणार आहेत. सिक्वेलसाठी फायनल डान्सर्स निवडता यावेत म्हणून रेमोने लोकल डान्सर्सला त्यांच्या डान्सचा व्हिडिओ पाठवण्याचे आवाहन केले आहे.