आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Respecting Owasi Followers Not See Jai Ho, Salaman Khan Responded To Waisi

ओवेसींचा आदर करणा-यांनी ‘जय हो’ पाहू नये, सलमान खानचे ओवेसींच्या आवाहनाला प्रत्त्युत्तर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘ज्या व्यक्तींना एमआयएमचे संस्थापक खासदार असदोद्दीन ओवेसी यांच्याबद्दल नितांत आदर आहे अशा व्यक्तींनी माझा ‘जय हो’ हा चित्रपट कधीही पाहू नये,’ अशी दबंगगिरी करत सुपरस्टार सलमान खानने ओवेसींच्या आवाहनाला प्रत्त्युत्तर दिले आहे.गेल्या आठवड्यात सलमानने भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यासमवेत गुजरातेत एका कार्यक्रमात पतंगबाजी करत मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली होती. गुजरात दंगलीसाठी मोदींना माफी मागण्याची गरज नसल्याचेही स्पष्ट केले होते. या दोन्ही दिग्गजांच्या भेटीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी ‘आयएमआय’चे संस्थापक व आंध ्रप्रदेशातील खासदार असदोद्दीन यांनी सलमानवर टीका करत ‘तो केवळ नाच्या असून त्याचा आगामी ‘जय हो’ चित्रपट पाहू नये,’ असे जाहीर आवाहन केले होते.
बॉलीवूडमध्ये बॅड बॉय अशी इमेज असली तरी सलमान नेहमीच उदयोन्मुख कलाकारांना करिअर घडण्यात मदत करतो. तसेच सामाजिक भावनेतून तो अनेक गरजूंना मदतही करत असतो. तीन वर्षांपूर्वी त्याने ‘बीइंग ह्यूमन’ या संस्थेची स्थापना केली आहे. गेल्या वर्षी मराठवाड्यात भीषण दुष्काळ पडल्यानंतर त्याच्या संस्थेने शेकडो पाण्याच्या टाक्या पाठवल्या होत्या. त्यामुळे ओवेसींनी त्याच्याबद्दल काढल्या उद्गारामुळे चाहत्यांमध्ये नाराजी पसरली होती.
दरम्यान, सलमाननेही ‘जे लोक ओवेसींना मानतात त्यांनी माझा चित्रपट पाहू नये,’ असे म्हणून प्रथमच एखाद्या राजकीय नेत्यांच्या टीकेला प्रत्त्युत्तर दिले आहे.
पुन्हा सलमानचा जलवा
सलमान खानचा चित्रपट प्रदर्शित झाला की तो हमखास हिट होणारच, असा ट्रेंड गेल्या काही वर्षांत तयार झाला आहे. याचा प्रत्यय पुन्हा एकदा ‘जय हो’च्या माध्यमातून आला आहे. देशात या चित्रपटाला 95 टक्के ओपनिंग मिळाले आहे. त्यामुळे ‘जय हो’ त्याच्या जुन्या चित्रपटाचा विक्रम मोडण्याची शक्यता आहे.